प्रतिनिधी / आटपाडी
कोरोना संकट कालावधीत राज्यातील नाभिक समाज बांधव अडचणीत आले. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने श्री संत सेना महाराज महामंडळ स्थापन करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोना काळात आत्महत्या केलेल्या १४ नाभिक व्यवसाय चालकांनी सरकारने मदत करावी. नाभिक समाजातील गरजूंना अल्पव्याजदराने कर्ज द्यावे. सरकारकडून कोणतीही योजना नाभिक समाजासाठी नाही. हबीब सारख्या अनेक मोठ्या ब्रँडेड सलूननी बाजारात प्रवेश केलाय. त्यामुळे सामान्य नाभिक व्यवसायिकांच्या पोटावर पाय आला आहे. अद्ययावत नाभिकी व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी संस्था निर्माण कराव्यात.
या मागण्यांसोबतच प्रति शिवाजी शूरवीर शिवा काशीद यांच्या स्मरकाकडे दुर्लक्ष न करता तेथे सुविधा द्याव्यात, अशी मागणी करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारचे नाभिक समाज्याकडे लक्ष वेधण्याचा पत्राद्वारे प्रयत्न केला आहे.