कोरोना लॉकडाऊन व कामगार स्थलांतराचा परिणाम
यमगे/समीर कटके
आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये जानेवारी महिन्याच्या 10 तारखेपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार हमी योजना अंतर्गत सुमारे दहा कोटी भारतीयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशी माहिती राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना नरेगा यांच्या पोर्टल वरून मिळाली. वर्ष 2019 2020 मध्ये या योजनेचे लाभार्थी 7.89 टक्के इतके होते. तर चालू आर्थिक वर्षात हे प्रमाण 21 टक्क्यावर पोहोचली आहे.या आर्थिक वर्षातील अजूनही 2 महिन्याचा कालावधी शिल्लक असल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अंतर्गत लाभार्थींची संख्या अजूनही वाढेल असा अंदाज आहे.
ही योजना 2016 साली सुरू झाली. आर्थिक वर्ष 2011-2012 मध्ये या योजनेचे सर्वाधिक म्हणजे 8.2 टक्के इतके लाभार्थी नोंद झाले होते. नरेगा पोर्टल वरील माहिती नुसार या आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची संख्या ही योजनेच्या आरंभापासून आज पर्यंत सर्वोच्च आहे.
राज्यांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील 1.07 कोटी कामगारांनी या योजनेत काम मिळवले. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 1.06 कोटी राजस्थान 99.25 लाख, मध्यप्रदेश 91. 62 लाख, आंध्रप्रदेश 77. 57 लाख आणि तामिळनाडू 75.37 लाख लाभार्थीनी या योजनेतून रोजगार मिळवले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत या योजनेत आपले नाव नोंदवणाऱ्या व कुशल कामगारांना वर्षातील 100 दिवस रोजगार आणि मजुरी यांची शाश्वती देण्यात येते.
Previous Articleराममंदिर : निधी संकलनाची योजना तयार
Next Article तृणमूल खासदार देवतांसंबंधी बरळला









