ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :
जम्मू काश्मीरमध्ये संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मूमधील उधमपूर, डोडा, किस्तवाड, पूछसह काश्मीर घाटीमधील लोकांना भूकंप जाणवला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
यापूर्वी गेल्या सोमवारी देखील सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 8.33 मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती.