दापोलीत कावळे ‘बर्डफ्ल्यू पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरात गेल्या आठवड्यात डम्पिंग ग्राउंडवर मृतावस्थेत आढळून आलेले पाचही कावळे बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली असून राज्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत माहिती देताना पशुवैद्यकीय उपआयुक्त डॉ. लोंढे म्हणाले की दापोली डम्पिंग ग्राउंडवर मृतावस्थेत आढळून आलेले कावळे पुण्याला अधिक तपासणीकरिता पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी दापोलीला प्राप्त झाला. यामध्ये पाचही कावळे बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आले. असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. यामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली असून दापोली नगरपंचायतीने लोकांना सतर्कतेचे आवाहन केलेले आहे.








