प्रतिनिधी / शिराळा
शिराळा येथील निनाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री हिराई देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये बीएससी नर्सिंग व ए.एन.एम.नर्सिग महाविद्यालय सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली असून विद्यार्थीनी प्रवेश घ्यावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले आहे.
अध्यक्ष सत्यजित देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात शैक्षणिक दालने सुरु करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करत आहे. विशेषतः ग्रामीण व डोंगरी भागातील विद्यार्थीना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी संस्थेने अनेक नवनवीन दालने सुरु केली आहेत. या वर्षी शिराळा येथे बीएससी नर्सिंग व एन एम नर्सिंग हे दोन नवीन महाविद्यालय सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली आहे.विद्यार्थीना याठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणे सुलभ होणार आहे. दोन्ही प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी कोणत्या ही शाखेचा इयत्ता 12 पास असणे आवश्यक आहे. विद्यार्थी व विध्यार्थीनी साठी होस्टेल ची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.