ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात आज दिवसभरात 287 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 93,398 इतकी आहे. सद्य स्थितीत 3215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1568 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 87,370 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- लसीकरण लवकरच सुरु होण्याची शक्यता : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, कोविडचे लसीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना लसीकरणासाठी पूर्ण व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 12 जानेवारी रोजी लसीकरणाची ड्राय रन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्हिडियो कॉन्फरन्स द्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य सचिव अमित नेगी, डॉ. पंकज कुमार पांड्ये, आमिता उप्रेती सह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.









