प्रतिनिधी/ बेळगाव
गॅस सिलिंडर देताना 50 रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात आहे. जर ही रक्कम दिली नाही तर सिलिंडर देण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे संबंधित गॅस एजन्सी धारकांवर कारवाई करावी, अशी मागणी माळमारुती येथील यल्लाप्पा सिद्धाप्पा तक्केवारी यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्धारे केली आहे.
वंटमुरी येथील पुष्पिका गॅस डिलर एजन्सीकडून हा प्रकार सुरू आहे. तेंव्हा जिल्हाधिकाऱयांबरोबरच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि.नेही कारवाई करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. सिलिंडर गॅसला 703 रुपये आकारले जातात. मात्र अधिक 50 रुपये मागण्यात येत आहेत. ते देण्यास मी नकार दिला. यामुळे सिलिंडर बुकींग करूनही ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत कार्यालयात गेले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. तरी याची चौकशी करावी, असे या निवेदनात म्हटले आहे..









