ऑनलाईन टीम / मुंबई :
भंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेत 10 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल रात्री 2 वाजता घडली. तर 7 बालकांना वाचवण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आलं. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. या आगीत आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली सात बालकांना वाचवण्यात आलं. पण आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.