बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात नवीन कृषी संजीवनी मोबाईल टेस्टिंग लॅब वाहनांचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषी संजीवनी या चाचणी मोबाईल लॅब सर्व जिल्ह्यात माती, पाणी व माहिती आणि पिकाशी संबंधित समस्यांविषयी संबंधित उपायांची तपासणी करण्यासाठी मदत होणार आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आगामी काळात अशी आणखी वाहने सुरू केली जातील. तसेच या मोबाईल टेस्टिंग लॅब वाहनांचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे म्हण्टले आहे. कृषीमंत्री बी. सी पाटील यांनी हा लँड टू प्रोजेक्ट आहे. शेताच्या संजीवनी वाहनात एम्बुलन्स स्टाईल सायरन बसविण्यात आले आहे.
दरम्यान सुधारित कृषी उत्पादन तंत्रज्ञान, दर्जेदार कृषी साधनांचा पुरवठा आणि शिफारस केलेल्या खतांचा वापर, कीटक व रोग व्यवस्थापन, जमिनीत उपलब्ध पोषकद्रव्ये आणि योग्य पीक वाढीस प्रोत्साहित करणे हे या विभागाचे काम असणार आहे.