कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारकडे मागितले स्पष्टीकरण
बेंगळूर/प्रतिनिधी
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार होत आहे. दरम्यान राज्यात युनायटेड किंगडमहून आलेल्या ३०६२ प्रवाशांपैकी ७०० हून अधिक प्रवाशांनी कोरोना विषयक आरटी-पीसीआर चाचणी केलेली नाही. यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने लेखी माहिती दाखल केल्यानंतर मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ज्या प्रवाशांनी कोरोना चाचणी केलेली नाही ती संख्या ७०० हुन अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही तफावत स्पष्ट करावी लागेल, असे त्यांनी म्हंटल आहे. मंगळवारी खंडपीठाने कोरोना व्यवस्थापनाविषयी संबंधित मुद्यांसंबंधीच्या पीआयएल याचिकांवर मंगळवारी सुनावणी केली.