कबनूर / वार्ताहर
कोरोची ता. हातकणंगले येथील चावरे व पोफळे यांच्या मळ्यात आज नऊ च्या सुमारास शेतकऱ्यांना रान गव्यांचे दर्शन झाले. पहिल्यांदा गावातील शेतकऱ्यांना रान गवा रेड्याचे दर्शन झाल्यामुळे अनेक शेतकरी घाबरून गेले आहेत. वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. मात्र, शोधाशोध करूनही गवे दिसले नाहीत. गवा कबनूर च्या दिशेने गेल्याचे हे सांगण्यात येत आहे.
कोरोची व कबनूरातील शेतकऱ्यांनी वेळीच सावध राहावे व तसे आढळून आल्यास ग्रामपंचायत अथवा वनविभागाला संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे .
Previous Articleखुल्या, ओबीसींवर अन्याय करणारा निर्णय मागे घ्या
Next Article मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सुकाणु समिती









