पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा
प्रतिनिधी / सांगली
भारतीय माहिती अधिकार’ या मान्यताप्राप्त न्युज वेब पोर्टल व वृत्तपत्र समुहातर्फे प्रती वर्षाप्रमाणे यंदाही दिनदर्शिकचे प्रकाशन करण्यात आले. इस्लामपूर येथे राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते हा प्रकाशनसोहळा पार पडला. यावेळी समुहाचे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रतिनिधी प्रभात हेटकाळे पत्रकार शंकर देवकुळे, महेश तिवडे आदींसह अनेक मान्यवर पत्रकार, व प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतीय माहिती अधिकार’ या मान्यताप्राप्त न्युज वेब पोर्टल व वृत्तपत्र समुहातर्फे दरवर्षी आकर्षक व माहितीयुक्त दिनदर्शिका प्रकाशित केले जाते. भारतीय माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा हे मुख्य उद्देश ठेवून ही दिनदर्शिका प्रकाशित केली जात असून, यामध्ये विधान साक्षरता घरोघरी व्हावी, माहिती अधिकार कायदा सामान्य माणूस पण वापरू शकेल अशा प्रकारची माहिती या दिनदर्शिकेमध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व वेब न्युज चॅनेल व वृत्तपत्रlमध्ये बातम्यांबरोबरच या कायद्याची माहितीही दिली जाते.








