पतीनेच त्यांना गंभीर भाजलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
पेटवून घेण्यामागचे कारण समजू शकले नाही
प्रतिनिधी / सातारा
घरात पतीपत्नी दोघेच होते. पती हे पुढच्या हॉलमध्ये होते. तर पाठीमागच्या हॉलमध्ये प्राथमिक शिक्षिका असलेल्या देवयानी सत्यवान हवाळे (वय 53, रा. तामजाईनगर) यांनी अंगावर रॉकेल ओतून घेवून पेटवून घेतले. त्यांनी आत्यहत्येचा प्रयत्न का केला याचे कारण समजू शकले नाही. तब्बल 100 टक्के भाजल्या असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सत्यवान हवाळे सातारा जिल्हा परिषदेत सेवेत होते. त्यांनी सातारा पंचायत समितीच्या सभापतींचे स्वीय्य सहाय्यक, जिल्हा परिषदेच्या तात्कालिन महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते. त्यांनी गेल्या दिवसांपूर्वी सेवा निवृत्ती घेतली होती.
त्यांच्या पत्नी देवयानी या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून सवृश्रृत आहेत. त्यांनी जेथे जेथे काम केले तेथे तेथे त्यांनी आमुलाग्र बदल केला आहे. ते दोघेच तामजाईनगर येथे रहात आहेत. आज दुपारी 12.30 च्या सुमारास दोघेच घरात असताना पाठीमागच्या रुममध्ये असलेल्या देवयानी यांनी अंगावर रॉकेल ओतून घेवून स्वतःला पेटवून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी पेटवून घेतल्याची माहिती पुढच्या खोलीत बसलेल्या सत्यवान हवाळे यांना समजताच ते थोडेसे सुरुवातीला हडबडले अन् त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तेथून जखमी अवस्थेत झालेल्या देवयानी यांना त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरु असून त्या 100 टक्के भाजून जखमी झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.