ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनच्या समुद्री हद्दीत भारताची दोन जहाजे आणि त्यावरील 39 नौसैनिक मागील काही महिन्यांपासून ताटकळत थांबले आहेत. या जहाजांमधील माल अद्याप उतरवून घेण्यात आला नाही. त्यामुळे जहाजांच्या तात्काळ मदतीसाठी भारताने चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची संपर्क केला आहे. भारताचे परराष्ट्र प्रवक्ते श्रीवास्तव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भारताचे एमव्ही जगआनंदव हे मालवाहू जहाज चीनच्या हुबेई प्रांतातील जिंगटांग बेटावर उभे आहे. त्या जहाजावर 23 नौसैनिक आहेत. तर एमव्ही अनासतासिया हे जहाज 20 डिसेंबरपासून चीनच्या कोओफिदीयन बंदरावर अडकले आहे. या जहाजांवर 39 नौसैनिक आहेत.
या नौसैनिकांना मानवी मूलभूत गरजा लक्षात घेऊन व्यवहारिक आणि भोजनासह इतर मदत करण्याची अपेक्षा भारतीय परराष्ट्र अधिकाऱ्यांनी चीनकडून ठेवली आहे.









