नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स निर्मात्यांच्या गटाने सरकारकडे मोबाइल फोन्सवरील अबकारी शुल्कात (बेसीक) 20 टक्के कपात करण्याची मागणी केली आहे. भारतात मोठय़ा प्रमाणात मोबाइल फोन्सची निर्मिती होत आहे. त्यामुळे आता आयातीची भीती बाळगण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त होत आहे. मोबाइल निर्मिती उद्योगाने आता स्पर्धा देण्याची पूर्ण तयारी केली आहे. याचसोबत मोबाइलवरील जीएसटी दर 18 वरून 12 टक्के करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जेणेकरून मोबाइल स्वस्त होऊन विक्रीत वाढ होईल.








