प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 1964 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केले होते. गुरुवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली यामध्ये 14 इतके अर्ज अवैध ठरले तर 1950 इतके अर्ज वैध ठरले आहेत.
शिरोळ तालुक्यातील नरसिंह वाडी, गौरवाड ,कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, घालवाड, जांभळी, बस्तवाड , मजरेवाडी, तेरवाड, शिरढोण , शिरदवाड, यड्राव ,निमशिरगाव, तमदलगे, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, हसुर, शिरटी , घोसरवाड ,दत्तवाड ,टाकळीवाडी ,जुने दानवाड ,उदगाव ,कोथळी ,दानोळी ,जैनापूर ,धरणगुत्ती, नांदणी ,चिपरी व कोंडिग्रे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे.
या 33 गावातील उमेदवार स्थानिक नेते मंडळी व त्यांचे समर्थक छाननी प्रक्रियेत आपला अर्ज बाद होऊ नये कायदेशीर अडचण निर्माण होऊ नयेत या हेतूने वकिलांची फौज उभी केली होती बहुसंख्य उमेदवारांनी हरकत न घेता निवडणुकी समोर जाण्याचे ठरले त्या नुसार बहुसंख्य उमेदवारांनी हरकती घेतलेल्या नाहीत.
दानोळी ग्रामपंचायतीच्या 17 जागेसाठी 124 विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत तर सर्वात कमी बस्तवाड ग्रामपंचायतीच्या 9 जागेसाठी तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत चार तारखेपर्यंत माघार घेण्याची मुदत असून त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे काही ग्रामपंचायतीच्या प्रभागातील निवडणुका बिनविरोध झाल्यापासन अधिकृत निकाल चार तारखे नंतरच जाहीर केली जाणार आहे.