भाजप सरकार व पंतप्रधान शेतकरी विरोधी. लवकरात लवकर नवीन कृषी कायदा रद्द करा.
डिचोली / प्रतिनिधी
दिल्ली येथे कडाक्मयाच्या थंडीत आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱयां?प्रती केंद्रातील मभाजप सरकारने अजूनही कोणतीच आस्था दाखविलेली नाही. सत्तेवरील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकरी विरोधी असून आपल्या छुप्या हेतूंसाठी आज त्यांनी शेतकऱयांना रस्त्यावर आणण्याचे कारस्थान रचत सर्वांचा विरोध असलेला घातक कायदा अंमलखत आणला आहे. या कायद्याला विरोध करताना शेतकऱयांच्या आंदोलनाला सर्वतोपरी काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार आहे, असे निवेदन अखिल भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा राज्याचे प्रभरी अखिलेश यादव यांनी डिचोली येथे केले.
शेतकऱयांना पाठिंबा आणि सरकारचा निषेध करण्यासाठी डिचोलीतील सेतू संगमजवळ डिचोली युवा काँग्रेसतर्फे मशाल निदर्शने आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिलेश यादव बोलत होते. यावेळी डिचोली युवा काँग्रेस अध्यक्ष मनोज नाईक, गौतम भगत, जना भंडारी, नझीर बेग, फिरोज बेग, गजनाफर आगा व इतरांची उपस्थिती होती.
शेतकरी हे या देशाचे अन्नदाता आहेत. आणि आज तेच आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत आहेत हि या सरकारसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. या सरकारने आज शेतकऱयांनाही रस्त्यावर आणले आहे. बडय़ा धनाढ्य व्यवसायिकांच्या भल्यासाठी शेतकऱयांचा बळी देण्यास हे सरकार आता सज्ज झालेले आहे. या सरकारला या कृत्याची फळे भविष्यात भोगावी लागणारच. युवा काँग्रेस शेतकऱयांबरोबर सदोदित राहणार, असेह यावेळी अखिलेश यादव यांनी म्हटले.
यावेळी गौतम भगत यांनी, या सरकारने आजपर्यंत लहान व्यवसायिकांना रसातळालाच नेण्यचे काम केले आहे. कृषी कायद्यातही गुप्त हेतू असल्याने केंद्र, सरकार ते मागे घेऊ पाहत नाही. केवळ धनाढय़ांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी हे सरकार आज कार्यरत असून त्यांना मध्यम व लहान दर्जातील लोकांचे पडून गेलेले नाही, असे म्हटले.
सेतू संगमवर मशाली हातात घेऊन “किसानो के सन्मान मे, युवा काँग्रेस मैदान मे”, “नरेंद्र मोदी किसान विरोधी” अशा घोषणा देत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा शेतकऱयांना जाहीर केला.









