प्रतिनिधी / पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकाने (एएनसी) मोरजी येथे केलेल्या कारवाईत 6 लाख रु. किंमतीचा ड्रग्स जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयिताचे नाव बिनोद गोस्वामी (32, उत्तराखंड) असे आहे. संशयित पर्यटक म्हणून गोव्यात आला असता मोरजी येथील एका हॉटेलात राहिला होता. संशयित ड्रग्सची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर हॉटेलवर धाड मारुन संशयिताला रंगेहात अटक केली आहे. त्याच्या खोलीतून 1 किलो 200 ग्रॅम चरस जप्त केला आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत 6 लाख रु. असल्याचे पोलिसांनी सांगितले. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









