प्रतिनिधी/ मडगाव
कारची जबरदस्त धडक बसून स्कुटरचालकाला मृत्यू येण्याची घटना दांडेवाडी- चिंचोणे येथे सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. मयताचे नाव आंतोनियो ग्रासियस (65) असे आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी उशिरा दांडेवाडो -चिंचोणे येथे ही घटना घडली. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आके -आल्त, मडगाव येथील संशयित साहील शैलेश गिंडे हा 23 वर्षीय युवक जीए-07-के-4988 क्रमांकाची कार घेऊन मडगावच्या दिशेहून कुंकळीच्या दिशेने जात होता.
दांडेवाडी पाच रस्ता जंक्शनजवळ ही कार पोहोचली असता जीए-01-डब्ल्यु-1491 क्रमांकी येत होती व कार चालकाने या दुचाकीला वाट दिली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. परिणामी, या दुचाकीला जोरदार धडक दिली. 65 वर्षीय आंतोनियो ग्रासियस ही दुचाकी चालवत होता. कारची जबरदस्त धडक बसल्याने स्कुटरस्वार गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर मडगावातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरु करण्यात आले. मात्र तो वाचू शकला नाही. उपचारादरम्यान आंतोनियो ग्रासियस दगावला.
कुंकळी पोलिसांना या घटनेची खबर कळताच पोलीस तपास सुरु झाला आणि या प्रकरणातील कार चालक साहील शैलेश गिंडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 279 व 304 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.









