चालू वर्षातील आकडेवारीचा समावेश : मागील वर्षाच्या तुलनेत 35 टक्क्यांची घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या कारणास्तव चालू वर्ष हे भारतासोबत जगालाही आर्थिक स्तरावर अडचणीचे राहिले आहे. या कालावधीमध्येही भारतीय स्टार्टअप्सने मध्ये 68 हजार कोटी रुपयाची (9.3 अब्ज डॉलर) गुंतवणूक करण्यात आली अशी माहिती कंसलटेंसी फर्म ट्रक्सन यांच्याकडून देण्यात आली आहे. सदरची गुंतवणूक ही मागील वर्षाच्या तुलनेत 35 टक्क्यांनी कमी राहिल्याचीही माहिती आहे.
वर्ष 2019 मध्ये भारतीय स्टार्टअप्सने 1.06 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक (14.5 अब्ज डॉलर) केली होती. 2019 मधील 1185 च्या तुलनेत 2020 मध्ये 1088 गुंतवणूक व्यवहार झालेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार 2020 मध्ये 100 दशलक्ष किंवा त्याहून अधिक 20 फंडिंग राउंडचे आयोजन करण्यात आले आहे. 2019 मध्ये हा आकडा 26 होता. या पद्धतीने 50 दशलक्ष ते 100 दशलक्ष डॉलरपर्यंतच्या व्यवहाराचा आकार असणाऱया 13 फंडिंग राउंडचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्टार्टअप्सना चालू वर्षातील दुसऱया सहामाहीत अधिकची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. पहिल्या सहामाहीत स्टार्टअप्सला 461 व्यवहाराच्या आधारे फक्त 4.2 अब्ज म्हण्जे जवळपास 30 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मिळाली होती. 2020 मध्ये रोजर-पे, ग्लांस, अन-ऍकेडमीसह 11 भारतीय स्टार्टअप युनिकॉर्न बनले आहे.
दिग्गज तंत्रज्ञानाची भक्कम गुंतवणूक
2020 मध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक यासारख्या दिग्गज तंत्रज्ञानासह भारतीय स्टार्टअप्समधील गुंतवणूक वाढली आहे. यासह सीमा वादामुळे चीनच्या दिग्गज कंपन्यापैकी अलिबाबा आणि टेंसेंटचे गुंतवणुकीत घट झाली आहे. नव्या स्टार्टअप कंपन्याही नोंद झाल्या आहेत.









