पुलाची शिरोली/ वार्ताहर
भरधाव टाटा सुमोच्या धडकेत वृध्द महिला जागीच ठार झाली. नीलाबाई कृष्णात कांबळे (वय ६०, रा. नेज, ता. हातकणंगले) असे या वृद्धमहिलेचे नाव आहे. पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी , नीलाबाई कांबळे यांची सून पतीसोबत भांडून माहेरी शिरोली येथे आली आहे. सुनेला भेटून तीची समजुत काढायची व तीला परत घेऊन जायचे या उद्देशाने निलाबाई या शिरोलीत आल्या होत्या. पण सुनेने येण्यास नकार दिला. त्यामुळे नीलाबाई नेजला परत निघाल्या होत्या. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दत्त मंदिराच्या बाजूस बस स्टॉपवर जात असताना पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा सुमोने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये नीलाबाई यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिरोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









