मौजे दापोली /वार्ताहर
नाताळची सुट्टी लागल्यापासून पर्यटकांचा ओघ वाढत आहे त्यामुळे होणाऱ्या वादावादी, चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवणे अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दापोली पोलिसांकडून चोख खबरदारी घेतली जात आहे. याकरिता इतर तालुक्यातून पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त फौज मागविण्यात आलेली आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाकडून पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली आहे त्यामुळे दापोली तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा सुरू आहे परंतु अनेक पर्यटक हे मध्ये पीक असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर भानगडी करणे खोल समुद्रात पोहायला जाणे यामुळे अपघात होणे असे प्रकार घडत असतात. नाताळ सणात त्याचबरोबर 31 डिसेंबर यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दापोली पोलीस ठाणे सज्ज झाले आहे दापोलीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर ती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.