बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात डॉक्टरांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक वैद्यकीय महाविद्यालये आवश्यक आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारीत (पीपीपी) अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास सरकार तयार आहे, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
मंगळवारी शिवाजीनगर येथे अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय विज्ञान व संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते झाल्यानंतर मंत्री सुधाकर यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले.
द्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी ६००-७०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जर ते पीपीपी मॉडेलमध्ये बांधले गेले तर ते सरकारी तिजोरीवरील ओझे कमी होईल आणि गरजू लोकांना परवडणारे वैद्यकीय शिक्षण आणि उपचार उपलब्ध करण्यास मदत होईल. हे मॉडेल गुजरातमध्ये अवलंबले जात आहे आणि ही अंमलबजावणीही येथेही केली जाईल, असे डॉ.सुधाकर म्हणाले.
डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १००० लोकसंख्येसाठी एक डॉक्टर असावा. परंतु आपल्या देशात प्रत्येक १०-१२ हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर आहे. त्यामुळे अधिक संख्या निर्माण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या ६ वर्षात १५७ हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये जोडली आहेत, असेही मंत्री म्हणाले.