सातारा : सातारा सर्व दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-सी झेड मालिका 0001 ते 9999 पर्यंत संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 31 डिसेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
ज्या वाहनधारंकाना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक फी भरुन आरक्षित करावयाचे आहे, त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून फी भरुन नंबर आरक्षित करुन ठेवावेत. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असेल तर नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.