प्रतिनिधी / सांगली
पलूस तालुक्यामध्ये रविवारी एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळलेला नव्हता तर आज अचानक आमणापूर गावात ६ कोरोना बाधीत रूग्ण आढळलेला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांनी दिली आहे.
आज अखेरपर्यंत पलुस तालुक्यात कोरोना बाधीत २५४४ रूग्णांची संख्या झाली आहे. तर उपचारानंतर २४५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात ६ अॅक्टिव रूग्ण असुन ते होम आयसुलेशन मध्ये ६ आहेत. कोविड सेंटर मध्ये २ रूग्ण उपचाराखाली आहेत.