वनविभागाने सुरक्षित स्थळी सोडले
वार्ताहर/ चाफळ
चाफळ विभागातील डेरवण (ता. पाटण) येथे माळ नावाच्या शिवारात संदीप पाटील यांच्या शेतात रविवारी दुपारी रानमांजराची दोन पिल्ले आढळून आली. वनविभागाने ही पिल्ले सुरक्षितस्थळी नेऊन सोडली.
डेरवण येथील संदीप पाटील यांच्या शेतात रविवारी गवत काढणीचे काम सुरु होते. गवत कापणी सुरु असताना अचानकपणे कामगारांना वन्यप्राण्याची दोन पिल्ले निदर्शनास आली. सुरुवातीला ती बिबटय़ाची पिल्ले आहेत की काय, या शंकेने भीती निर्माण झाली. याची माहिती मिळताच वनरक्षक विलास वाघमारे यांनी पाटील यांच्या शेतात जाऊन पिल्लांची पाहणी केली असता ती रानमांजराची पिल्ले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या दोन्ही पिल्लांना ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडून दिले.








