कार व दुचाकीत भीषण अपघात, दुचाकीचा चक्काचूर.
डिचोली/प्रतिनिधी
विठ्ठलापूर साखळी येथे उतरणीवर काल रविवार दि. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी कार व दुचाकी यांच्यात झालेल्या एका भीषण अपघातात विर्डी साखळी येथील तरुण ठार झाला. मयताचे नाव संजिव नामदेव कामत (वय 46, रा. गावकरवाडा विर्डी सांखळी) असे असून या प्रकरणी कारचालक अशोक लक्ष्मण नाईक (वय 46, ओशलबाग धारगळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही दुर्घटना काल संध्या. 4.30वा. च्या सुमारास घडली. मयत संजिव कामत हा आपल्या जीए 05 एच 3832 या डिओ स्कुटरवरून साखळीहून डिचोलीच्या दिशेने जात असताना समोरून साखळीच्या दिशेने जीए 11 ए 2956 या व्हेगन आर या कारने येणाऱया अशोक नाईक याने चुकीच्या दिशेने जात स्कुटरचालक संजिव कामत याच्यावर जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी डिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण कठडाही गाडीच्या धडकेने कोसळला. या धडकेमुळे संजिव यांच्या डोक्मयाला जबर मार बसला. लागलीच त्यांना 108 रूग्णवाहिकेतून साखळी येथील सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बांबोळी येथे नेले जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
या अपघाताचा पंचनामा साखळी पोलीस आऊट पोस्टचे हवालदार सत्यवान गावस यांनी केला तर पुढील तपास उपनिरीक्षक दिपेश शेटकर करीत आहेत.









