प्रतिनिधी / दापोली
पर्यावरण जपण्यासाठी सायकल कशी उपयुक्त आहे हा संदेश देण्यासाठी आणि सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी दापोलीतील सायकलप्रेमींनी एकत्र येऊन शनिवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी दापोली शहरात सायकल फेरी काढली.
ही सायकल फेरीला दापोलीतील आबालवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच प्रदूषणमुक्त दापोलीसाठी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा जास्तीच जास्त वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.









