प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील शिपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन पोपट तुकाराम बाबर (वय 56) यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सात जणांवर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोपट बाबर हे काँग्रेसचे मिरज तालुका उपाध्यक्ष असून, ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाला होता.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विनायक शामराव बाबर, परशुराम मारुती बाबर, बाबासा राजाराम बाबर, सुर्यकांत रामचंद्र बाबर, सुनिल बाबासा बाबर, शरद शंकर बाबर, आदित्य बाबर (सर्व रा. शिपूर) यांचा समावेश आहे.