कळंबीच्या तरुणाची फसवणूक, दोघांविरुध्द तक्रार
प्रतिनिधी / मिरज
लकी ड्रॉमध्ये सफारी गाडी मिळाली आहे, त्यासाठी प्रोसेस फि व जीएसटी अशी रक्कम आगाऊ भरण्यास सांगून तालुक्यातील कळंबी येथील तरुणास सुमारे पावणे तीन लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज इम्रान मुजावर (वय 25) यांनी अमितकुमार अग्निहोत्री आणि मनिष कुमार या दोघांविरोधात ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर दोघांनी गुगल पेवरून पैसे घेतले. त्यानंतर गाडीची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन मोबाईल बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मुल्ला यांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी मनिषकुमार आणि अमितकुमार या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणारे सदर दोघे परप्रांतीय आहेत.