लिंगायत समाजाचे निवेदन, मिरज जंक्शनला बसवेश्वरांचे नांव देण्याची मागणी
प्रतिनिधी / मिरज
मिरज रेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वरांचे द्यावे, या मागणीसाठी सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने शिवसेना खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलीक यांना निवेदन देण्यात आले. महात्मा बसवेश्वरांचे नांव भावी पिढीला प्रेरणादायी असल्याने शासन दरबारी पाठपुरावा करुन नामकरणास परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाज बांधवांनी खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलीक यांची भेट घेऊन निवेदन दिले.