मनपा क्षेत्रात सहा वाढलेः ग्रामीण भागात 17 वाढलेः एकाही मृत्यूची नोंद नाही
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हयात कोरोनाचे नवे 23 रूग्ण वाढले तर 15 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी एकही रूग्ण दगावला नसल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. सध्या उपचारात 194 रूग्ण आहेत. तर आजअखेर जिल्ह्यात एक हजार 727 रूग्णांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येवू लागला आहे. शुक्रवारी नवीन 23 रूग्ण आढळून आले त्यामध्ये महापालिका क्षेत्रात सहा नवीन रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात सहा रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 16 हजार 438 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील 96 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात 17 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात सहा तर कडेगाव तालुक्यात एक रूग्ण वाढला आहेत. पलूस तालुक्यात एक तर तासगाव तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात सहा आणि शिराळा तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे. कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा, कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नाही.
उपचार सुरू असणारे 15 रूग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर जिल्ह्यात 45 हजार 554 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट आता 96 टक्केपेक्षा अधिक झाला आहे. शुक्रवारी एकाही रूग्णांच्या मृत्यूची नेंद नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे. जिल्ह्यात आजअखेर एक हजार 727 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
नवे रूग्ण 23
उपचारात 194
बरे झालेले 45554
एकूण 47475
मृत्यू 1727








