लंडनहून आलेले नऊजण विलगीकरणात : प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन, व्यापक सर्वेक्षण सुरु
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिह्यात इंग्लंड मध्tान 10जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील 10 दिवसांत हे 9 जण जिह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त झाली. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले असुन पुढील 28 दिवस आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवणार आहे.
केंद्र सरकारकडून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला लंडनहून आलेल्या 9 प्रवाशांची यादी प्राप्त झाली. तात्काळ या लोकांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी बहुसंख्य रत्नागिरी तालुक्यातील तर काही जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यात आलेल्या लोकांपैकी एकजण मद्रास येथे तर दुसरा रायगड येथे गेला आहे असे समजते. बाकीचे रत्नागिरी शहरातील आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथे विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पुढील 28 दिवस त्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर सहवासातील व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅंड, इटली या देशातून आलेल्या प्रवाशांवर आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहे. रत्नागिरी जिह्यात त्यासाठी विशेष तपासणी मोहिम सुरु आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिह्यात आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशी माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी दिली. लोकांनी नवीन व्हेरीएंट, सार्समुळे घाबरुन जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
जिह्यात कोरोनाचे 18 नवे रूग्ण
11 रूग्ण झाले कोरोनामुक्त – 194 अहवाल निगेटिव्ह
जिह्यामध्ये गुरूवारी 18 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ तर 11 बरे झालेल्या रूग्णांना जिल्हा शासकीय रूग्णालयातनू उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 9 हजार 130 पर्यत पोहचली असल्याचे जिल्हा शासकीय रूग्णालयातून सांगण्यात आले आह़े
रत्नागिरी तालुक्यात 4, खेड 2, गुहागर 7, चिपळूण 1, लांजा 3 राजापूर 1 असे रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण रूग्णसंख्या 9 हजार 130 इतकी झाली आह़े तर 11 कोरोनापासून बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आले आह़े एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 622 वर पोहचले आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.43 इतके आह़े
एकूण रूग्ण-9130
नवे रूग्ण -18
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -327









