खानापूर : डिस्ट्रिक्ट रिजनल चेअरपर्सन लायन अरविंद टेणगी यांनी नुकताच खानापूर लायन्स क्लबला भेट दिली. भेटी दरम्यान लायन्स क्लब राबवत असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती देऊन यापुढे नवनवीन सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला झोन चेअरपर्सन जुनैद तोपिनकट्टी हे ही उपस्थित होते.
खानापूर लायन्स क्लबचे श्रीशैल्य उप्पीन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत खानापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष अजित पाटील यांनी तर आभार लायन्सचे सेपेटरी अनिल देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला खानापूर लायन्सचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.









