ईमेल-कॅलेंडरची सेवा देण्यावर झूमचा प्रयत्न : नवीन वर्षात सेवा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झूम ऍप आता दिग्गज कंपनी गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीला टक्कर देण्याची तयारी करत आहे. महामारीच्या दरम्यान लाँच केलेल्या आपल्या व्हिडीओ कॉलिंग सर्व्हिसची सेवा घेऊन बाजारात उतरल्यानंतर बाजारात मजबुत स्थिती प्राप्त केल्यानंतर झूम आता एक ईमेल सेवा विकसित करणार असून आगामी वर्षात ही सेवा सादर करण्याची योजना बनवत असल्याचे संकेत आहेत. इतकेच नाही, तर झूम कॅलेंडर ऍपवरही काम करत असल्याची माहिती आहे.
द इन्फॉर्मेशनकडून आपल्या अहवालात ही माहिती दिली असून झूम-व्हिडीओ कम्युनिकेशन एक वेब ईमेल सेवा विकसित करुन पुढील वर्षात काही ग्राहकांना सेवा देताना प्रारंभिक व्हर्जन सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीसाठी एक वर्ष ब्लॉकबस्टर राहिले आहे, यामध्ये दुर्गम क्षेत्रातील काम आणि लर्निंग क्षेत्रामध्ये तेजी आली आहे. या कारणामुळे कंपनीच्या समभागात जवळपास 500 टक्क्यांची वृद्धी राहिली आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यालयात 365 प्लॅटफॉर्म आणि गुगलने आपल्या प्रतिस्पर्धी वर्क-स्पेस बंडलसोबत याच सेगमेंटमध्ये पहिल्यापासूनच पाय ठेवले आहेत. जे येणाऱया काळात झूमला स्पर्धक म्हणून राहणार आहेत. सदर प्लॅटफॉर्ममध्ये प्रामुख्याने कॅलेंडर, ईमेल आणि व्हिडीओ-क्रॉन्प्रंसिंगसारखी सेवा सादर करणार आहे.
कंपनीचे ध्येय असल्याची माहिती आहे.
ठळक बाबी
महामारीने प्रेरित दुर्गम भागात आणि शिक्षण क्षेत्रात झूमने आपल्या तिसऱया तिमाहीत 777.2 दशलक्ष व्यवसाय करण्यासाठी आपले त्रैमासिक उत्पन्न चौप्पट केले आहे.
कंपनीकडे 433,700 ग्राहक होते. जे मागील तिमाहीत 370,200 पेक्षा अधिक राहिले होते.









