वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टेलिग्राम ऍप वर्ष 2021 मध्ये आपली पेड सर्व्हिस सादर करणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांनी यावेळी म्हटले आहे, की व्यवसाय चालविण्यासाठी 2021 मध्ये महसूलाची गरज भासणार आहे. ग्राहक संख्येत होत असणाऱया वाढीचा विचार करुन पेड फिचर्सची सुविधा येत्या काळात सुरु होणार असल्याचे टेलिग्रामने स्पष्ट केले आहे.
कंपनीला फंडिंगची गरज असते, परंतु यासाठी ऍपवर जगभरातील जवळपास 50 कोटी ऍक्टिव्ह ग्राहक जोडले जाण्याचे संकेत आहेत. यामुळे हे संकेत लक्षात घेत हा निर्णय घेतला जाणार असल्याचे टेलिग्रामने सांगितले आहे.
व्हिडीओ डाऊनलोडसाठी वापर
टेलिग्राम ऍपचा वापर हा जास्तीत जास्त चित्रपट आणि वेब सीरीज डाऊनलोड करण्यासाठी केला जात आहे.
मोफत फिचर्स मोफतच राहणार
टेलिग्राम आगामी वर्षात महसूल कमाईसाठी प्रयत्न करणार आहे. परंतु आम्ही सात वर्षांच्या दरम्यान तयार केलेल्या आपल्या मूल्याच्या आधारेच हे काम करणार असल्याचे कंपनीचे सीईओ पावेल डुरोव यांनी म्हटले आहे. यामध्ये जे ऍप मोफत आहेत ते मोफतच राहणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.









