बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत राज्यभरातील विद्यमान प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) सुधारण्यासाठी आणि 24/7 क्लिनिक म्हणून कामकरण्यासंदर्भात बैठक घेतली. यावेळी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सद्य स्थिती संदर्भात आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या कार्यालयातील पायाभूत सुविधा आणि धोरणांमध्ये सुधारणा करून ग्रामीण आरोग्य सेवेच्या पुनरुज्जीवन प्रस्तावाचा आढावा घेतला.









