प्रतिनिधी / सातारा
मलकापूर ता. कराड येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून राहूल मर्ढेकर यांनी बुधवारी पदभार स्विकारला. चार महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी यांची बदली झाली होती. त्यानंतर आज राहूल मर्ढेकर यांनी मुख्याधिकारी म्हणून नगरपरिषदेचा कार्यभार स्विकारला.
सातारा जिल्ह्यातील ओझरे (ता. जावळी) हे मर्ढेकर यांचे मूळ गाव असून त्यांना प्रशासकीय सेवेचा मोठा अनुभव आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणच्या कामांना गती देण्यासह प्रशासकीय शिस्त लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिल्या पाचमधे येण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे. यामधे मुख्याधिकारी मर्ढेकर काय उपक्रम राबवतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.









