सुरेश बंडगर महाराज यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
माधवनगर रोड जकातनाका नजीकच्या शिवोदयनगर येथे प्रत्येक वर्षी साजरी होणारा सार्वजनिक श्री दत्त जयंती उत्सव सोहळा चालू वर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश बंडगर (महाराज) यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री जन्मोत्सव, पाळणा, भजन, यासह सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात होते. चालू वर्षी मंगळवार, 29 डिसेंबर रोजी होणारा दत्त जयंती सार्वजनिक स्वरूपातील उत्सव सोहळा रद्द करण्यात आल्याचे बंडगर महाराज यांनी सांगितले. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.








