बेंगळूर
आयटी व सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी विप्रो आपल्या कर्मचाऱयांसाठीच्या वर्क फ्रॉम होमच्या मोहिमेला मुदतवाढ देणार असल्याचे समजते. कंपनीतील कर्मचाऱयांना आता 4 एप्रिल 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. कोरोनाचा प्रभाव अद्यापही काही प्रमाणात जाणवत असल्याने कर्मचाऱयांची सुरक्षा लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्याला कंपनीचे 98 टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. कंपनीत सध्याला 1.8 लाख कर्मचारी सेवा बजावत आहेत.









