आर्थिक वर्ष 23 मध्ये 300 कोटी अधिक उत्पन्नाचे उद्दिष्ट
पुणे : गरवारे पॉलिस्टर लि. (जीपीएल) या गरवारे समूहाच्या प्रमुख कंपनीने आणि स्पेशल्टी पॉलिस्टर व सन कंट्रोल फिल्ममधील भारतातील आघाडीच्या कंपनीने ऑटोमोबाइल पेंट संरक्षणासाठी भारतात पेंट प्रोटेक्शन फिल्मच्या (पीपीएफ) उत्पादनास सुरुवात केली आहे. सध्या, पेंट प्रोटेक्शन फिल्मची जागतिक उलाढाल 500 दशलक्ष डॉलर आहे आणि त्यामध्ये 3M, ल्युमर (इस्टमनकडून), XPEL अशा जागतिक कंपन्या आघाडीवर आहेत.
पेंट प्रोटेक्शन फिल्मची रचना अशा प्रकारे केली आहे की, ऑटोमोबाइल पेंट कोटिंगना सर्वाधिक संरक्षण व इम्पॅक्ट रेझिस्टन्स हा फायदा मिळणार आहे. या फिल्म स्पष्ट, सेल्फ-हीलिंग पेंट प्रोटेक्शन फिल्म आहेत. अशा प्रकारच्या विशेष उत्पादनांमुळे वाहनांचे पेंट कोटिंग अधिक टिकते व त्यामध्ये सेल्फ-हीलिंग गुणधर्म असतात. पीपीएफचे उत्पादन विशेष प्रकारे तयार केलेल्या थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन फिल्मचा (टीपीयू) वापर करून केले आहे. यामुळे अत्यंत विश्वासार्हता व सातत्यपूर्ण कामगिरी केली जाते. फोर्स-डिसिपेशन गुणधर्म असणाऱ्या अत्यंत स्पेशलाइज्ड फिल्म वाहनांच्या रंगाचे ओरखडे, पोक यापासून व रस्त्यावरील डेब्रिस व खडक, तसेच पर्यावरणीय घटकांमुळे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
आर्थिक वर्ष 23 मधील उत्पन्नामध्ये कंपनीच्या पेंट प्रोटेक्शन फिल्मचे योगदान 20% असणार असून ही रक्कम 300 कोटी रुपयांनी असेल. जीपीएल पीपीएफची किंमत भारतात उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक असणार आहे. कारण, त्याची निर्मिती जीपीएलच्या अत्यंत कार्यक्षम, एकात्मिक उत्पादन प्रकल्पामध्ये केली जाणार आहे.
पीपीएफ लाइन उत्पादन सुरू झाल्याबद्दल बोलताना, गरवारे पॉलिस्टरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. बी. गरवारे यांनी सांगितले, गरवारे 1974 पासून पॉलिस्टर फिल्म उत्पादनातील प्रवर्तक असून, दुसऱ्या तिमाहीतील आमची उत्तम कामगिरी विचारात घेता आम्ही पीपीएफ लाइन सुरू झाल्याने कंपनीच्या कामगिरीमध्ये मोलाचे योगदान मिळणार आहे. हे उत्पादन देशांतर्गत ग्राहकांसाठी, तसेच निर्यातीसाठी उपलब्ध होणार आहे. आम्ही निर्माण करत असलेल्या स्पेशल्टी उत्पादनामध्ये जागतिक आघाडी घेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रॉडक्ट लाइनचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करतो. पीपीएफ लाइनच्या बाबतीतही आम्ही हे साध्य करू शकू, असा विश्वास मला आहे.”









