प्रतिनिधी / सांगली
प्रभाग क्र. १६ मधील एमएसईबी कार्यालय परिसरातील दत्त मंदिर येथे नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्या प्रयत्नातुन स्वतंत्र पाणी कनेक्शनची व्यवस्था करण्यात येत आहे.
स्वतंत्र पाईप लाईन टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामाची शिंदे यांनी पाहणी केली. प्रभाग क्रमांक 16 खण बाग येथे विविध विकास कामे सुरू असून दत्त मंदिर परिसर येथील विकास कामाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला.








