शाहूपुरी : कोरोना निर्बंध हटविल्यानंतर जिल्ह्यात एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात फेऱ्या कमी असल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या लग्नसराई असल्याने खरेदीसाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. मात्र अपुऱ्या वाहनांमुळे ताटकळत थांबावे लागत आहे.
सातारा जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दूरच्या जागी जाणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. मात्र, दिवाळीसंपल्याने चाकरमानी आपापल्या कामाच्या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे आता परळी, सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी, वाघवाडी, निगुडमाळ, कातवडी , नित्रळ या ग्रामीण भागात फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी एस टी महामंडळाच्या वतीने लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.









