प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरातील नाचणे परिसरात ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी गाडी भरून पुस्तकाचे वाटप करणाऱया अल्पवयीन मुलांवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. शहर पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांची व कार्यकर्त्यांची चौकशीची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होत़ी
हातखंबा ते नाचणे-शांतीनगर परिसरात गाडीमधून ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्थानिक अल्पवयीन मुले ख्रिश्चन धर्माशी निगडित काही पुस्तके वाटप करत असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली होत़ी त्यानुसार शांतीनगर येथील काही नागरिक व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पुस्तके विक्री करणाऱया या 11 मुलांकडे याबद्दल अधिक चौकशी केल़ी मात्र या मुलांनी समाधानकारक माहिती दिली नाह़ी तसेच मुलांना ही पुस्तके कोणी व कोठून मिळाली व कोणी वाटण्यासाठी दिली, याची माहिती देखील सांगायला तयार नव्हत़े त्यामुळे यासाठी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आल़े शहरातील ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडे चौकशी केली असता आपण असे काही मुलांना करायला सांगितले नसल्याचे ख्रिश्चन धर्मीयांनी स्पष्ट केल़े या प्रकरणात संबंधित 11 मुलांच्या पालकांना शहर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होत़े शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राकेश नलावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. मात्र पोलीस ठाण्यात चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.