साहित्य : अर्धी वाटी गव्हाचे पीठ अथवा मैदा, चिमुटभर बेकिंग सोडा, चिमुटभर मीठ, 2 चमचे साखर, 2 चमचे ब्राऊन शुगर, पाव वाटी बटर, पाव चमचा व्हॅनिला इसेंस, पाव वाटी चॉकलेट चिप्स, 2 चमचे दूध
कृती : बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करावे. दुसऱया बाऊलमध्ये बटरमध्ये ब्राऊन शुगर आणि साखर मिक्स करावी. आता यात मैद्याचे मिश्रण घालून मळून घ्यावे. मिश्रण फारच कोरडे झाले असल्यास त्यात दूध घालून मळावे. फारच सैल झाले असल्यास त्यात मैदा अथवा गव्हाचे पीठ मिक्स करावे. आता मळलेल्या गोळय़ामध्ये चॉकलेट चिप्स मिक्स करून गोळा हलक्या हाताने पुन्हा मळून 20 ते 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावा. ओव्हन 180 डीग्रीवर प्रिहीट करावे. आता फ्रिजमधील गोळा बाहेर काढून पंधरा मिनिटांनी त्याचे छोटे गोळे बनवून बिस्किटचा आकार द्यावा. तयार कुकीज बेकिंग ट्रेवर ठेवून 10 मिनिटे बेक करावे. कुकीज गार झाले की खाण्यास द्या.