दाट धुक्मयामुळे प्रवासी बस गॅस टँकरवर आदळली
लखनौ : उत्तर प्रदेशमधील संभल जिह्यात एक प्रवासी बस थेट गॅस टँकरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात 8 प्रवासी ठार झाले तर 21 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे सध्या उत्तरेकडे पहाटेचे दाट धुके पसरत आहे. प्रत्येक वषी थंडीत दाट धुक्मयामुळे तिथे अनेक अपघात होतात. हा अपघातही दाट धुक्यामुळेच घडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळतीची शक्मयता असल्याने आजुबाजूचा परिसर सील करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.
मुरादाबाद आग्रा महामार्गावर चंदौसी जवळील धनौरी गावाजवळ हा अपघात घडला. ही बस अलिगढ डेपोमधील असून या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा चालक एका उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्या चालकाला धुक्मयामुळे ट्रकच्या पुढचा गॅस टँकर दिसला नाही. त्यामुळे बस भरधाव वेगात टँकरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की बसची एक बाजू पूर्णपणे टँकरमध्ये घुसली होती. घटनास्थळी रक्ताचा सडा आणि बसच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत होते.









