प्रतिनिधी / कोल्हापूर
गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ट्विटर अकाऊंट बुधवारी हॅक झाले. त्याबाबतची तक्रार त्यांनी मुंबई सायबर सेलकडे केली आहे . बुधवारी सकाळी त्यांचे ट्वीटर अकाऊंट लॉक झाले असून सर्व ट्वीट्स डिलीट झाले आहेत. पाटील यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर अचानक ट्वीट्स दिसत नव्हते. शिवाय सतेज पाटील यांचे नाव आणि फोटोही नाहीसा झाला होता.
त्यामुळे पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट कोणीतरी हॅक केल्याचा संशय निर्माण झाला होता . पाटील यांच्या अकाउंटवर कोणताही इतर मेसेज दिसत नव्हता. काही आक्षेपार्ह अथवा पाटील यांच्या मताशी विरोधात असे कोणतेही ट्विट करण्यात आलेले नाही. अधिक तापसानंतर सर्व माहिती समोर येणार आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ट्विटर अकांउट सर्व ट्विट अचानक डीलिट झाले. या प्रकरणी गृहराज्यमंत्री पाटील यांनी मुंबई सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
आज सतेज पाटील यांच्या ट्विटर अकांउटवरील त्यांच्या नावासह सर्व ट्विट डीलिट झाले होते. मात्र असे झाले असले तरी कोणताही आक्षेपार्ह मजकूर दिसला नाही.