पेठ वडगाव/प्रतिनिधी :
चंद्रकांतदादा पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा पदाधिकारी यांच्यातून करण्यात आली आहे. यामुळे चंद्रकांतपाटील यांना होम पिचवर आव्हान उभे होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. होम पीच वर करण्यात आलेल्या आव्हानावर चंद्रकात पाटील यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पेठ वडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनीही राजीमाना द्यावा अशी मागणी द्यावी भाजपाच्या आजी-माजी पदाधिकारी यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस माजी भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, शाहुवाडी माजी तालुकाध्यक्ष दाजी चौगुले, भाजपा जिल्हा किसान मोर्चा माजी अध्यक्ष योगेश परुळेकर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगले माजी तालुकाधुक्ष पी.डी.पाटील, यांनी बोलताना चंद्रकांत पाटील व समरजीत घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला आहे की, चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे.
या पुणे पदवीधर मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात दोनवेळा प्रकाश जावडेकर यांचा विजय झाला असून तिसऱ्यांदा सुनील मोदी यांच्या बंडखोरीमुळे प्रकाश जावडेकरांचा अल्पमतांनी पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत सत्ता नसताना सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर विजयाची परंपरा कायम ठेवली व गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असूनही २०२० च्या पुणे पदवीधर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला असून हा पराभव कोल्हापूर जिल्हा भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या ढिसाळ नियोजनामुळे झाला आहे.
या निवडणुकीत निष्ठावंत व परिवारातील कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक निवडणूक प्रचार यंत्रणेत विचारात घेतले नाही. नको त्या लोकांना हातात प्रचार यंत्रणा दिली गेली. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी गांभीर्य पाळले नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर या पूर्वी या मतदार संघात विजय मिळविल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला मंत्रिपद व पक्षाचे उच्च पद मिळाले आहे. त्यामुळे या मतदार संघाला विजयाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले होते. मात्र पदवीधर निवडणुकीत या प्रदेशाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्य यांचे साफ दुर्लक्ष झाले. यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत भाजपच्या कार्यकर्त्यानी केली आहे.
Previous Articleसातारा : कृषी कायदे शेतकऱ्यांचे संरक्षक कवच
Next Article अभिनेत्री तापसी पन्नूसोबत धावणार सांगलीची रसिका माळी









