थंडीत आल्हाददायक वाटत असलं तरी या दिवसात हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह स्थूल मैत्रीणींनी विशेष काळजी घ्यायला हवी. घरात हृदयविकाराचा इतिहास असल्यास या दिवसात उगाचच धावपळ करू नये. थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्यामागील कारणांविषयी…
* थंड वातावरणामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे हृदयाला होणार्या रक्तपुरवठय़ात अडथळे येऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
* या दिवसात ऊन थोडं उशीरा पडत असल्यामुळे भल्या पहाटे फिरायला जाऊ नये. या दिवसात हृदयाची धडधड वाढते. रक्तदाब आणि कार्टिसोल हार्मोन्स वाढल्यामुळे त्रास होऊ शकतो.
* शरीराचा रक्तदाब पहाटे किंवा सकाळच्या वेळी वाढत असल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो.
* उच्च रक्तदाब असलेल्यांचा सिस्टोलिक रक्तदाब 120-139 एमएमएचजी आणि डायस्टोलिक रक्तदाब 80 ते 89 एमएमएचजीच्या दरम्यान असल्यास हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियमितपणे तपासत रहा.
* हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करा. तेलकट, मसालेदार पदार्थांऐवजी ताज्या भाज्या आणि फळं खा. नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम करा. * उच्च रक्तदाब असलेल्या मैत्रीणींनी 15 मिनिटांपेक्षा अधिक व्यायाम करू नये. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नयेत. व्यायामानंतर लगेच चहा, कॉफी घेऊ नये. तसंच धूम्रपानही करू नये.