वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सचे माजी फुटबॉल प्रशिक्षक तसेच फुटबॉल व्यवस्थापक गेरार्द हौलियर यांचे वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. सदर माहिती फ्रान्सच्या फुटबॉल फेडरेशनने सोमवारी प्रसिद्ध केली.
फ्रान्सचे हौलियर यांनी फ्रान्समधील ऑलिंपिक लेनॉस, पॅरीस सेंट जर्मन आणि लिव्हरपूल फुटबॉल क्लबला मार्गदर्शन केले होते. काही दिवसापूर्वी हौलियर यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रविवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात हालविण्यात आले होते पण वैद्यकीय इलाज चालू असताना त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 1973 साली हौलियर यांनी आपल्या फुटबॉल प्रशिक्षण कारकीर्दीला प्रारंभ केला होता.









